साहित्य :
४ कप बेसन
२ कप तूप (वितळलेले)
२ कप पीठीसाखर (+/- गरजेनुसार)
८-१० tbsp वेलची पूड
४-५ tsp दूध
काजू, बेदाणे गरजेनुसार
कृती :
१. जाड बुडाच्या कढईमध्ये तूप घेऊन त्यात बेसन मध्यम आचेवर भाजून घ्यावे, सतत ढवळत रहावे. आधी मिश्रण घट्ट होईल आणि २-३ मिनिटांनी पातळ होईल.
२. मिश्रण मध्यम brown रंगावर भाजून झाले की गॅस बंद करावा. त्यात दूध शिंतडावे. बेसन फसफसेल. दूध सारखे एकत्र करून घ्यावे. दूध घातल्यावर मिश्रण थोड़े गडद रंगाचे होईल, साखर घातल्यावर रंग थोड़ा फिकट होतो.
३. बेसन कोमट झाले की त्यात पीठीसाखर आणि वेलची पूड घालवी आणि हाताने सगळे एकत्र करून घ्यावे म्हणजे साखर सगळीकड़े लागेल आणि गुठळ्या मोडून मिश्रण एकसारखे होईल.
४. पूर्ण गार झाल्यावर बेदाणे आणि काजू लावून लाडू बनवावे.
टीप :
१. बेसन अगदी गार होण्याच्या आधी त्यात पीठीसाखर घालवी म्हणजे ती वितळते आणि चांगली एकत्र होते.
२ जर लाडूचे final मिश्रण घट्ट वाटत असेल, तर १-२ tsp तूप पातळ करून त्यात सोडावे, आणि परत सगळे मिश्रण मळावे.
३. Final मिश्रण पातळ वाटत असेल, तर थोड़े बेसन बिन तुपावर भाजुन त्यात घालावे आणि सगळे मिश्रण मिक्सर मधून काढावे. नंतर लाडू वळावेत.
४. लाडूचे मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे. हाताला गार लागले तरी साखर आतून गरम असते. लाडू वळण्याआधी कमीतकमी ३-४ तास थांबावे.