Tuesday, November 3, 2015

दिवाळी फराळ : शंकरपाळे



साहित्य:

१/२ कप दूध
१/२ कप तूप
१/२ कप साखर (+/- ३-४ चमचे )
३ कप मैदा
१-२ चमचे बारीक़ रवा (optional )
तेल








कृती :

१. दूध, तूप आणि साखर एकत्र करून गॅस वार गरम करावे. साखर वितळली की गॅस बंद करावा.
२. वरील मिश्रण कोमट झाल्यावर एका परातीत मैदा घ्यावा. त्यात साखर-तूप-दुधाचे मिश्रण हळू ओतावे आणि मैदा भिजवावा. भिजवलेला मैदयाचा गोळा पूरी च्या पीठासारखा एकदम घट्ट असला पाहिजे. थोड़ा सैल वाटत असेल तर अजुन थोड़ा मैदा घालावा.
३. घट्ट भिजववलेले पीठ कमीतकमी १ तास झाकून ठेवावे.
४. १-२ तासाने पीठ परत मळावे. जितके जास्त वेळ मळाल, तेवढे चांगले शंकरपाळे बनतील.
५. एक छोटा गोळा घ्यावा आणि त्याची पातळ पोळी लाटावी. कातळाने त्याचे शंकरपाळे पडावे. सगळे तुकडे वेगळे करून घ्यावे.
६. तेलामध्ये तळावे. तळताना झाऱ्याने तेल हलवत रहावे आणि मध्यम तपकिरी रंगावर काढावे.

टिप :
१. थोड़ा रवा घातला तर शंकरपाळे जास्त खुसखुशीत होतात.
२. जर जास्त मैदा घालावा लागला तर थोड़ी पीठी साखर घालावी म्हणजे गोड चव नीट येइल.
३. मोहन (तूप ) जास्त झाले असेल, तर लाटताना तुकडे पडतील. थोड़ा मैदा आणि पीठीसाखर घालून परत मळून घ्यावे. खूप काही फरक पडत नाही, फक्त जास्त तेल पीतात.
४. खूप घट्ट झाले असेल तर दूध घालून मळावे.


No comments:

Post a Comment