Wednesday, November 4, 2015

दिवाळी स्पेशल : बेसनाचे लाडू




साहित्य :

४ कप बेसन
२ कप तूप (वितळलेले)
२ कप पीठीसाखर (+/- गरजेनुसार)
८-१० tbsp वेलची पूड
४-५ tsp दूध
काजू, बेदाणे गरजेनुसार









कृती :

१. जाड बुडाच्या कढईमध्ये तूप घेऊन त्यात बेसन मध्यम आचेवर भाजून घ्यावे, सतत ढवळत रहावे. आधी मिश्रण घट्ट होईल आणि २-३ मिनिटांनी पातळ होईल.
२. मिश्रण मध्यम brown रंगावर भाजून झाले की गॅस बंद करावा. त्यात दूध शिंतडावे. बेसन फसफसेल. दूध सारखे एकत्र करून घ्यावे. दूध घातल्यावर मिश्रण थोड़े गडद रंगाचे होईल, साखर घातल्यावर रंग थोड़ा फिकट होतो.
३. बेसन कोमट झाले की त्यात पीठीसाखर आणि वेलची पूड घालवी आणि हाताने सगळे एकत्र करून घ्यावे म्हणजे साखर सगळीकड़े लागेल आणि गुठळ्या मोडून मिश्रण एकसारखे होईल.
४. पूर्ण गार झाल्यावर बेदाणे आणि काजू लावून लाडू बनवावे.

टीप :
१. बेसन अगदी गार होण्याच्या आधी त्यात पीठीसाखर घालवी म्हणजे ती वितळते आणि चांगली एकत्र होते.
२ जर लाडूचे final मिश्रण घट्ट वाटत असेल, तर १-२ tsp तूप पातळ करून त्यात सोडावे, आणि परत सगळे मिश्रण मळावे.
३. Final मिश्रण पातळ वाटत असेल, तर थोड़े बेसन बिन तुपावर भाजुन त्यात घालावे आणि सगळे मिश्रण मिक्सर मधून काढावे. नंतर लाडू वळावेत.
४. लाडूचे मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे. हाताला गार लागले तरी साखर आतून गरम असते. लाडू वळण्याआधी कमीतकमी ३-४ तास थांबावे.

दिवाळी स्पेशल : चकली भाजणी

साहित्य :

४ कप जाड़े तांदूळ
२.५ कप चणा डाळ
१.२५  कप उडीद डाळ
३/४ कप साबुदाणा
१/२ कप धणे
१/२ कप जीरे

कृती :


  1. तांदूळ, आणि डाळी स्वच्छ धुवाव्या आणि निथळुन घ्याव्यात. तांदूळ धुतल्यावर फुलतात , साधारण ४ कपाचे ५.५ कप पर्यन्त होतील 
  2. तांदूळ पूर्ण वाळवू नयेत, थोडेसे ओलसर असतांना भाजून घ्यावे. खूप भाजू नयेत, हलक्या गुलाबी रंगावर काढावेत. 
  3. इतर डाळीदेखील वेगवेगळ्या कढयांमध्ये भाजाव्यात, मध्यम भाजाव्यात. 
  4. साबुदाणा अगदी मंद आचेवर हलका परतून घ्यावा. 
  5. धणे आणि जीरेसुद्धा वेगवेगळे हलके भाजून घ्यावे. 
  6. सगळे जिन्नस वेगवेगळया पेपर किंवा ताटलीत काढून गार करावेत. 
  7. गार झाल्यावर सगळे एकत्र करावे आणि बारीक दळुन घ्यावेत.  

Tuesday, November 3, 2015

दिवाळी फराळ : शंकरपाळे



साहित्य:

१/२ कप दूध
१/२ कप तूप
१/२ कप साखर (+/- ३-४ चमचे )
३ कप मैदा
१-२ चमचे बारीक़ रवा (optional )
तेल








कृती :

१. दूध, तूप आणि साखर एकत्र करून गॅस वार गरम करावे. साखर वितळली की गॅस बंद करावा.
२. वरील मिश्रण कोमट झाल्यावर एका परातीत मैदा घ्यावा. त्यात साखर-तूप-दुधाचे मिश्रण हळू ओतावे आणि मैदा भिजवावा. भिजवलेला मैदयाचा गोळा पूरी च्या पीठासारखा एकदम घट्ट असला पाहिजे. थोड़ा सैल वाटत असेल तर अजुन थोड़ा मैदा घालावा.
३. घट्ट भिजववलेले पीठ कमीतकमी १ तास झाकून ठेवावे.
४. १-२ तासाने पीठ परत मळावे. जितके जास्त वेळ मळाल, तेवढे चांगले शंकरपाळे बनतील.
५. एक छोटा गोळा घ्यावा आणि त्याची पातळ पोळी लाटावी. कातळाने त्याचे शंकरपाळे पडावे. सगळे तुकडे वेगळे करून घ्यावे.
६. तेलामध्ये तळावे. तळताना झाऱ्याने तेल हलवत रहावे आणि मध्यम तपकिरी रंगावर काढावे.

टिप :
१. थोड़ा रवा घातला तर शंकरपाळे जास्त खुसखुशीत होतात.
२. जर जास्त मैदा घालावा लागला तर थोड़ी पीठी साखर घालावी म्हणजे गोड चव नीट येइल.
३. मोहन (तूप ) जास्त झाले असेल, तर लाटताना तुकडे पडतील. थोड़ा मैदा आणि पीठीसाखर घालून परत मळून घ्यावे. खूप काही फरक पडत नाही, फक्त जास्त तेल पीतात.
४. खूप घट्ट झाले असेल तर दूध घालून मळावे.