Wednesday, April 5, 2017

भेंडीची रसभाजी

साहित्य:
१/२ किलो भेंडी
२ teaspoon चिंच
तिखट
मीठ
गोड मसाला
गूळ

कृती:

१. फोडणीत भेंडी परतून घ्यायची.
२. साधारण चहाचे २ चमचे चिंचेमध्ये थोडे थोडे पाणी घालून हाताने चोळावी म्हणजे आंबट पाणी निघून येईल ते पाणी भेंडीत घालायचे. नंतर साधारण १ वाटी साधे पाणी त्यात घालणे.
३. मग तिखट, मीठ, गोड मसाला+ गूळ टाकून उकळवून शिजवणे.
४. मध्यम गॅसवर घट्ट झाली तर पुन्हा थोडे पाणी घालून उकळावी. पातळ रस वाटला तर आणखी थोडा वेळ उकळावे म्हणजे दाटसर होते. 

पिठले (कुळीथ/चण्याचे)

साहित्य:

बेसन/कुळीथ पीठ
लसूण
राई
जिरे
हिरवी मिरची
आमसुले
पाणी
कांदा

कृती:

१. प्रथम तेलाच्या फोडणीत (लसूण बारिक चिरून टाकावा - optional) राई, जिरे, हिरवी मिरची बारिक चिरून जमल्यास कांदा टाकून परतावे.
२.  मग साधे गार पाणी घालावे. त्यात २-३ आमसुले टाकावी.
३. चांगले उकळायला लागले की मीठ टाकावे व एका हाताने एकीकडे ढवळत पीठ लावावे.  गुळण्या झाल्या तर हाताने साधे थंड पाणी थोडे थोडे शिंपडावे आणि ढवळावे म्हणजे गुठळ्या मोडतात. बारिक  गॅसवर ५- १० मिनिटे तरी उकळावे. घट्ट वाटले तर १/२(अर्धा) वाटी पाणी घालून २ मिनिटे उकळावे. पातळ CONSISTENCY वाटली तर उकळत असताना परत किंचीत पीठ लावावे.
४. बेसनाचे पिठले (झुणका) दुसऱ्या प्रकारे करायचा असेल तर प्रथम साधारण १/२ (अर्धा)वाटी पीठ + १ वाटी पाणी हाताने चांगले दुसऱ्या भांड्यात mix करून घ्यावे. हे मिश्रण कांदा परतून झाला कि लगेच ओतावे. चमच्याने चांगले ढवळावे. मीठ घालावे आणि १-२ कोकमं टाकावी. झाकण ठेवावे. २ मिनिटांनी झाकण काढून चांगले ढवळावे. परत झाकण ठेवावे. २ मिनिटांनी पुन्हा झाकण काढून चांगले ढवळावे. असे २-३ वेळा करावे( झाकण ठेवणे + ढवळणे) म्हणजे ते चांगले शिजते. 

दडपे पोहे

साहित्य:

पातळ पोहे(४ वाट्या)
ओला नारळ
बारीक चिरलेला कांदा
५-६ चमचे तेल
मीठ
पिठी साखर
हिरवी मिरची
आवडत असेल तर लाल तिखट
कोथिंबीर
आवडत असेल तर टोमॅटो

कृती:

१. पातळ पोहे कढईत थोडा वेळ सुकेच परतून चुरचुरीत करून घ्यावेत. जाड पोहे (२ वाट्या) असतील तर तसेच घ्यावेत.
२. त्यात ओला नारळ (भरपूर), कच्चेच म्हणजे न तापवलेले तेल ५-६ चमचे घालावे.
३. मीठ, साखर, कांदा , ओली मिरची अगदी बारिक चिरून घालावी.
४. लाल तिखट आणि कोथींबीर घालून हातानेच mix करावे.
५. आवडत असल्यास tomato बारीक चिरून घालावा.