Wednesday, April 5, 2017

पिठले (कुळीथ/चण्याचे)

साहित्य:

बेसन/कुळीथ पीठ
लसूण
राई
जिरे
हिरवी मिरची
आमसुले
पाणी
कांदा

कृती:

१. प्रथम तेलाच्या फोडणीत (लसूण बारिक चिरून टाकावा - optional) राई, जिरे, हिरवी मिरची बारिक चिरून जमल्यास कांदा टाकून परतावे.
२.  मग साधे गार पाणी घालावे. त्यात २-३ आमसुले टाकावी.
३. चांगले उकळायला लागले की मीठ टाकावे व एका हाताने एकीकडे ढवळत पीठ लावावे.  गुळण्या झाल्या तर हाताने साधे थंड पाणी थोडे थोडे शिंपडावे आणि ढवळावे म्हणजे गुठळ्या मोडतात. बारिक  गॅसवर ५- १० मिनिटे तरी उकळावे. घट्ट वाटले तर १/२(अर्धा) वाटी पाणी घालून २ मिनिटे उकळावे. पातळ CONSISTENCY वाटली तर उकळत असताना परत किंचीत पीठ लावावे.
४. बेसनाचे पिठले (झुणका) दुसऱ्या प्रकारे करायचा असेल तर प्रथम साधारण १/२ (अर्धा)वाटी पीठ + १ वाटी पाणी हाताने चांगले दुसऱ्या भांड्यात mix करून घ्यावे. हे मिश्रण कांदा परतून झाला कि लगेच ओतावे. चमच्याने चांगले ढवळावे. मीठ घालावे आणि १-२ कोकमं टाकावी. झाकण ठेवावे. २ मिनिटांनी झाकण काढून चांगले ढवळावे. परत झाकण ठेवावे. २ मिनिटांनी पुन्हा झाकण काढून चांगले ढवळावे. असे २-३ वेळा करावे( झाकण ठेवणे + ढवळणे) म्हणजे ते चांगले शिजते. 

No comments:

Post a Comment