Monday, February 20, 2017

साबुदाणा खिचड़ी

साहित्य:

२ वाटी साबुदाणा (१ माणसाला १ वाटी)
१/२(अर्धी) वाटी दाण्याचे कूट (अंदाजे १ वाटी साबुदाण्याला १/४th वाटी)
चवीनुसार साखर
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा जिरे
२-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
२-३ चमचे तेल/तूप

कृती:

१. साबुदाणा कमीतकमी ३-४ तास आधी पाण्यात भिजवावा. आधी स्वच्छ धुवून घ्यावा. अगदी किंचित जास्त पाणी ठेवावे.
२. फोडणीमध्ये तेल/तूप गरम झाल्यावर जिरे घालावे. जिरे तडतडल्यावर मिरच्या घालून मग त्यावर साबुदाणा घालावा.
३. त्यात मीठ, साखर, कूट घालून नीट एकत्र करावे आणि वाफ काढावी. साबुदाणा चिकट झाला असेल तर झाकण ठेऊ नये. आवडत असेल तर लिंबू, खोबरे, कोथिंबीर घालावी.

टीप:

१. जर बटाटा  घालायचा असेल तर कच्चा बटाटा फोडणी मध्ये परतून घ्यावा आणि नीट शिजल्यावर साबुदाणा घालावा. उकडलेला बटाटा देखील घालू शकतो.
२. आवडत असेल तर लाल तिखट किंवा लाल मिरची देखील फोडणीत घालू शकतो.






Monday, February 13, 2017

उपमा

साहित्य:
२ वाटी रवा
पाव वाटी तेल
१/२ tsp मोहरी
१/२ tsp जिरे
१/२ tsp किसलेलं आलं
चिमूटभर हिंग
१-२ हिरवी मिरची
१ tsp उडीद डाळ (optional)
४ वाट्या पाणी
१ कांदा
१ टोमॅटो (optional)
चवीनुसार साखर + मीठ

कृती:

१. रवा आधी सुकाच चांगला भाजून घ्यावा.
२. तेलाची राई (मोहरी) + जिरे + +हिंग+ मिरची +उडीद डाळ  + आलं + बारीक चिरलेला कांदा घालून फोडणी करावी.
३. फोडणीमध्ये आधी तापवलेला रवा घालावा आणि ३-४ मिनिटे चांगला गरम होऊ द्यावा. साखर ,मीठ घालावे. गॅस बारिकच राहू द्यावा.
४. मग आधण (गरम) साधारण दुप्पट पाणी हळूहळू घालावे. ५-१० मिनिटे बारीक गॅसवर वाफ येऊ द्यावी. असेल तर कोथिंबीर टाकावी. टोमॅटो टाकायचा असेल तर फोडणीनंतर कांडा परतावा. मग सुकाच भाजलेला रवा घालावा. मग अगदी बारीक चिरलेला tomato घालावा. ५ मिनिटे तरी चांगले परतावे. मग नंतर गरम पाणी घालावे.

गोड़ शिरा

साहित्य:

२ वाटी रवा
१ वाटी तूप
४-४.५ वाट्या पाणी किंवा दूध+पाणी
३.५ ते ४ वाट्या साखर
वेलची पूड/EVEREST  दूध मसाला
काजू/बदाम/बेदाणे (optional)
केळं (optional)

कृती:

१. प्रथम रवा सुकाच चांगला तांबूस भाजून घ्यावा. भाजताना खूप मोठा गॅस ठेवायचा नाही, रवा लगेच करपतो.
२. तूप कढईत तापवायचे, त्यात भाजलेला रवा घालायचा. एकीकडे पाणी/दूध+पाणी खूप गरम करावे.
३. रवा तुपात टाकला कि गॅस बारीक करावा. मग किंचित मीठ टाकावे. त्यात लगेचच(कारण रवा भाजलेला असतो) वरील liquid हळूहळू घालावे. २ मिनिटे झाकण ठेवावे.
४. २ मिनिटांनी झाकण काढावे आणि त्यात साधारण रव्याच्या १.५ ते २ पट साखर घालावी. आधी जास्त घालू नये. चवीप्रमाणे वाढवता येते. थोडा वेळ पुन्हा वाफ आणावी.
५. केळं घालायचं असल्यास कुस्करून घालावे. असल्यास वेलची पावडर/एवरेस्ट मसाला घालावा. पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवून परतावे.
६. पाणी/दूध adjust करावे. खूप घट्ट वाटत असेल तर गार liquid चालते.

टीप:

१. गोड़ शिरा तुपातच करायचा, तेलात नाही.
२. काजू/बदाम घालायचे असतील तर प्रथम गरम तुपात किंचित परतून लगेचच रवा घालावा.
३. बेदाणे साखरेबरोबरच घालावे.

साबुदाणा वडा

साहित्य:

२ वाट्या साबुदाणा
२-३ बटाटे
१-२ चमचे लाल तिखट
१-२ चमचे जिरे
१/२ वाटी दाण्याचे कूट
कोथिंबीर 
मीठ चवीनुसार

कृती:

१. साबुदाणा ५-६ तास पाण्यात भिजत घालावा. पाणी ठेवू नये.
२. बटाटे उकडून खूप कुस्करावे/किसावे.
३. त्यात लाल तिखट, जिरे, मीठ, कोथिंबीर आणि दाण्याचे कूट घालावे. सर्व खूप छान भरपूर वेळ मिक्स करावे. हातावरच चपटे गोळे करून तळावे.

मूग डाळ खिचड़ी

साहित्य:

२ वाट्या तांदूळ
१/२ वाटी मूग डाळ
१/४TH टीस्पून मोहरी
१/४TH टीस्पून जिरे
१ चिमूट हिंग
१-२ काड्या (१०-१२ पाने) कडीपत्ता
१/४TH  टीस्पून हळद
१ टीस्पून तिखट
१ टीस्पून गोड मसाला
१ टीस्पून धणे-जिरे मसाला
चवीनुसार मीठ

कृती:

१. तांदूळ आणि डाळ धुऊन चाळणीत टाकावे किंवा पाणी पूर्णपणे काढून ठेवावे.
२. फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता घालावा.
३. हळद घालून धुतलेले तांदूळ आणि डाळ टाकावे आणि ५-१० मिनिटे परतावे.
४. मीठ, तिखट, गोड मसाला/धने जिरे मसाला घालून कूकरच्या डब्यात साहित्य घालावे. साधारणपणे १.५(दीड) पट पाणी घालून २-३ शिट्ट्या द्याव्यात. Pressure pan मध्ये घातले तरी २-३ शिट्ट्याच कराव्यात.
५. कोथिंबीर आणि खोबरे घालून serve करावे. वरून तूप घालावे.