Monday, February 13, 2017

गोड़ शिरा

साहित्य:

२ वाटी रवा
१ वाटी तूप
४-४.५ वाट्या पाणी किंवा दूध+पाणी
३.५ ते ४ वाट्या साखर
वेलची पूड/EVEREST  दूध मसाला
काजू/बदाम/बेदाणे (optional)
केळं (optional)

कृती:

१. प्रथम रवा सुकाच चांगला तांबूस भाजून घ्यावा. भाजताना खूप मोठा गॅस ठेवायचा नाही, रवा लगेच करपतो.
२. तूप कढईत तापवायचे, त्यात भाजलेला रवा घालायचा. एकीकडे पाणी/दूध+पाणी खूप गरम करावे.
३. रवा तुपात टाकला कि गॅस बारीक करावा. मग किंचित मीठ टाकावे. त्यात लगेचच(कारण रवा भाजलेला असतो) वरील liquid हळूहळू घालावे. २ मिनिटे झाकण ठेवावे.
४. २ मिनिटांनी झाकण काढावे आणि त्यात साधारण रव्याच्या १.५ ते २ पट साखर घालावी. आधी जास्त घालू नये. चवीप्रमाणे वाढवता येते. थोडा वेळ पुन्हा वाफ आणावी.
५. केळं घालायचं असल्यास कुस्करून घालावे. असल्यास वेलची पावडर/एवरेस्ट मसाला घालावा. पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवून परतावे.
६. पाणी/दूध adjust करावे. खूप घट्ट वाटत असेल तर गार liquid चालते.

टीप:

१. गोड़ शिरा तुपातच करायचा, तेलात नाही.
२. काजू/बदाम घालायचे असतील तर प्रथम गरम तुपात किंचित परतून लगेचच रवा घालावा.
३. बेदाणे साखरेबरोबरच घालावे.

No comments:

Post a Comment