Monday, May 15, 2017

शेवयांची खीर

साहित्य:

शेवया
पाणी
१ लिटर दूध(५ कप्स)
साखर
मिल्क मसाला/वेलची पूड
तूप

कृती:

१. पातेले मंद आचेवर गरम करून त्यात तूप घालावे. तूप पातळ झाले कि त्यात शेवया घालून अगदी मंद आचेवर शेवया गुलाबीसर रंग येईस्तोवर भाजाव्यात. गुलाबी रंगावर भाजलेल्या शेवया बाजूला काढून ठेवाव्यात. 
२. थोडे पाणी घेऊन शेवया पातेल्यात शिजवून घ्याव्यात आणि ठेऊन द्याव्यात. वाटल्यास पातेल्यावर झाकण ठेवावे म्हणजे शेवया शिजतील. मधेमधे ढवळावे नाहीतर शेवया करपण्याची शक्यता असते.
३. त्याच पातेल्यात दूध गरम करावे. उकळी आल्यावर त्यात शिजलेल्या शेवया घालाव्यात. चवीनुसार साखर घालावी आणि हवे तेवढे दाट होईपर्यंत उकळावे. नंतर त्यात वेलची पूड/मिल्क मसाला घालावा. गरम किंवा थंड करून वाढावी.

मोदक सारण

साहित्य:

२-२.५ वाट्या ओला नारळ
२ कप गूळ
चहाचा चमचा तांदूळ पीठ
मिल्क मसाला

कृती:

पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि मिल्क मसाला घालावा. ढवळून बाजूला ठेवून द्यावे. शेवटी थोडंसं तांदूळ पीठ घालावे. 

हरभरे चाट

साहित्य:

हरभरे
१ लहान कांदा
१ लहान टोमॅटो
चाट मसाला
लिंबू
तिखट

कृती:

१. हरभरे ८-१० तास पाण्यात टाकायचे. ते मग चाळणीत धुऊन तसेच झाकून १-२ दिवस ठेवायचे म्हणजे त्याला
मोड येतात. किंवा धुतलेले हरभरे एखाद्या रुमालात/फडक्यात खूप तास ठेवले की सुद्धा मोड येतात. (अशीच सर्व कडधान्ये ठेवावी.)
२. मग मीठ व थोडे पाणी घालून ६-७ शिट्ट्या द्याव्यात.
३. नंतर आवडीप्रमाणे चाट मसाला, कांदा, टोमॅटो, लिंबू घालावे. थोडेसे तिखट घालावे.

टीप:
मूग-मटकी-चवळी यांना २-३ शिट्ट्या 

ताकातली भेंडी

कृती:

भेंडी स्वच्छ धुऊन पुसून घ्यायची. नेहमीप्रमाणे तेल/तुपाची फोडणी करणे. त्यात एक-दोन मिरच्या टाकून भेंडी १० मिनिटे परतायची. मग शिजत आली कि मीठ, साखर घालायची. असलं तर दाण्याचं कूट घाल. वाटलं तर थोड्या आंबट ताकात आणखी शिजव. गार झाल्यावर त्यात भरपूर दही घालणे. कोथिंबीर, कांदा optional. 

ताकातला पालक

साहित्य:

जिरे
मोहरी
हिंग
कडीपत्ता
१ जुडी पालक
मूठभर शेंगदाणे
१-२ हिरव्या मिरच्या
२ चमचे डाळीचे पीठ
२ वाट्या आंबट ताक
मीठ/साखर चवीप्रमाणे

कृती:
१. पालक स्वच्छ धुऊन  चिरून घ्यायचा. तो कूकरमध्ये शेंगदाणे, मिरची घालून भाताप्रमाणे (पाणी न घालता) उकडणे.
२. आंबट ताकात तो गार झाल्यावर कुस्करून घालणे. त्यातच २ चमचे डाळीचे पीठ mix करायचे म्हणजे फुटत नाही.
३. पातेल्यात प्रथम तूप/तेलाची फोडणी करा. जिरे/मोहरी/हिंग, कडीपत्ता, थोडी हळद घालून, त्यात पालक घाला. चवीप्रमाणे मीठ, साखर घालून उकळी काढा.