१. रवा आणल्याबरोबर लगेच न विसरता फ्रीजमध्ये टाकावा व लागेल तसा वापरून उरलेला रवा परत पुडीला रबर बांधून तो फ्रीजमध्ये ठेवावा किंवा आणल्याबरोबर तो कढईत जरासा गरम करून मग भरून ठेवावा.
२. कणीक तेल, मीठ घालून जरा जास्तच भिजवून ठेवावी म्हणजे आयत्यावेळी पोळ्या करायला सोपे जाते.
३. पुऱ्यांची कणीक थोडी जास्त घट्ट भिजव.
४. कडधान्ये - मूग, मटकी पाण्यात भिजवत ठेवावी(८-१० तास). मग मोड येण्यासाठी ती धुऊन घ्यायची. चाळणीत घालून १०-१५ तास किंवा थंडी असेल तर मोड यायला जास्त वेळ लागतो. मोड आलेली उसळ लवकर शिजते. मूग, मटकी मोड आल्यावर कुकरच्या डब्यात पाणी काढून शिजत ठेवावी आणि २-३ शिट्या कराव्यात.
५. शेंगदाणे असतील तर ते OVEN मध्ये किंवा कढईत चांगले भाजून ठेवावे म्हणजे अधे मधे खायला मिळतात आणि जर कूट करायचे असेल तर न सोलता कूट केले तरी चालते.
६. दूध जास्त असेल तर थोडी जास्त अशी रवा, शेवयांची खीर करून ठेवावी. रवा जराश्या तुपात लालसर भाजून घ्यावा व मग गरम दुधात टाकावा. एवरेस्ट मसाला/वेलची आणि साखर अंदाजाने घालावी. १ लिटर दूध - पाव वाटी भाजलेला रवा/शेवया टाकून उकळावे. जास्त रवा / शेवया एकदम टाकू नये. उकळल्यावर त्या फुगतात आणि खीर घट्ट होते. पातळ खीर वाटली तर आणखी घालता येतात.
७. बटाटे उकाडायचे असतील तर ते धुवून घ्यायचे आणि तसेच ओलसर बटाटे कुकरच्या डब्ब्यात ठेवून ३-४ शिट्ट्या काढायच्या.
८. PRESSURE-PAN मध्ये २-३शिट्ट्याच करायच्या. खूप शिट्ट्या करायच्या नाहीत, अन्न जास्त शिजते आणि मग चव जाते. Pressure - pan मध्ये कोणतीही भाजी without water शिजवायची नाही (१ कप पाणी). नाहीतर भाजी करपते व valve उडतो. छोले असतील तर ४-५ whistles कराव्या.
९. जर्मनच्या कुकरमध्ये जाळी बुडेल त्यापेक्षा थोडेसे पाणी अधिक घेणे. लिंबू वापरलेले असेल तर ते फ्रिजमध्ये आठवणीने ठेवणे आणि एखादी फोड १-२ दिवसांआड कुकरच्या डब्यांच्या खाली जाळीमध्येच आठवणीने टाकावी म्हणजे कुकर एकदम पांढरा स्वच्छ राहतो.
१०. Marketला गेल्यावर आलं, मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, कडीपत्ता, लिंबू आणणे. त्यापैकी जास्तीत जास्त गोष्टी नेहमी फ्रीजमध्ये सर्व separate bags मध्ये ठेवणे. वरील सर्व गोष्टी अगदी आयत्या वेळी धुणे.
११. साधारण वरण भात कुकर मध्ये लावायचा असेल तर ३-४ शिट्टया झाल्यावर ३-४ मिनिटे गॅस बारीक करून ठेवावा, म्हणजे भात छान मऊ शिजतो.
१२. १ माणसाला १ मूठ डाळ आमटीसाठी लागते. वरणासाठी १ माणसाला २ मोठी डाळ पुरे होते.
१३. ADDITIONAL पोळ्या असतील तर १ माणसाला अर्धा ते १ मूठ तांदूळ पुरतात. पोळ्या नसतील तर तांदूळ जरासे जास्त घालावे.
१४. १ वाटी पिठाच्या २-३ पोळ्या होतात.
१५. थालीपीठ- थालीपीठाची भाजणी असेल तर त्यात गरम पाणी घालावे आणि थालीपीठाची भाजणी नसेल तर घरातली कोणतीही पीठे mix करून ती गार पाण्यानेच पीठ भिजवावे. सुक्या पीठामध्येच अंदाजाने तिखट, मीठ, हळद, कांदा चिरून घालावे मग पाणी घालून खूप मळावे.
१६. कोशिंबीर - कोणत्याही कोशिंबिरीत दही घालायचे असेल तर अगदी आयत्यावेळी घालायचे नाहीतर पाणी सुटते.
१७. भाज्या (सोप्या व combination मध्ये)

- बटाटे + सिमला मिरची
- कांदा + बटाटे + टोमॅटो
- कांदा + वांगी + बटाटे
- भेंडी (भेंडी धुतल्यावर कधीही लगेच चिरायची नाही, ती सुकीच असली पाहिजे. घाई असेल तर टॉवेलने चांगली पुसून घ्यावी.)
- कांदा + टोमॅटो + भेंडी
- कांदा + (फरसबी/चवळी)
- उसळी - उसळी mostly कांदा परतून मग उकडलेली कडधान्ये टाकावी म्हणजे चव चांगली लागते. त्यात लाल तिखट + मीठ + थोडा धने जिरे मसाला/धने पावडर/गोड मसाला + गूळ घालावा.
- फ्लॉवर + बटाटे + टोमॅटो. (आलं ठेचून घालणे)
- कांदा + बटाटे (काचऱ्यांप्रमाणे चिरून )
- कांदा + मेथी + बटाटे (ह्या भाजीत चव पाहून त्याप्रमाणे आवडत असेल तर साखर टाकावी.)
- बटाटे + पालक (उकडून)
- पालक पनीर
- कांदा + टोमॅटो + आले लसूण paste optional + सर्व mix भाज्या ( गाजर+ फरसबी + फ्लॉवर + कोबी) जे available आहे त्याप्रमाणे + कोणताही मसाला थोडा रस ठेवून आटवावे म्हणजे चव चांगली येते.
१८. पराठा: कणीक + थोडासा ओवा (otherwise जिरे) + मीठ + थोडेसे तिखट + थोडे तेल घालून पीठ भिजवावे. खूप मळावे व जाडसर छोटीशी पोळी लाटावी. तव्यावर तेल टाकून चांगली परतावी.
१९. मोड आलेल्या कडधान्यांत ते २-३ शिट्ट्या उकडून त्यात मीठ, चाट मसाला, जिरे पावडर, थोडेसे तिखट, दही मिक्स करणे.
२०. आलू चाट: ४ बटाटे उकडून फोडी करायच्या. मग हिरवी मिरची + किंचित (पाव इंच) आले + पुदिना + कोथिंबीर पेस्ट करणे (जाडसर paste). ती मीठ लावून बटाट्यांना चोळणे.
No comments:
Post a Comment