साहित्य:
बटाटे - १ माणसाला २ मध्यम
तेल
मोहरी
हिंग
उडीद डाळ
मिरची
कडीपत्ता
हळद
मीठ
साखर
काचऱ्या :
१. बटाटे धुवून सोलायचे आणि मग काचऱ्यांप्रमाणे पातळ चिरायचे आणि पाण्यात घालायचे.
२. कढईत तेल टाकायचे. मोहरी, हिंग, उडीद डाळ, मिरची/कडीपत्ता बारीक चिरुन घालायचा.
३. हळद टाकून लगेच बटाट्याच्या फोडी घालायच्या(पाणी काढून). २-३ वेळा झाकण घालून परताव्या.
४. मग मीठ, किंचित साखर घालायची. असेल तर वरुन कोथिंबीर-खोबरे घालावे.
उकडलेली भाजी:
१. उकडलेले बटाटे गार करून घ्यावे आणि मध्यम आकाराच्या फोडी कराव्या.
२. मग फोडणीमध्ये वरील प्रमाणे असेल तर थोडे आले कुटून घाला.
३. असेल तर कांदा टाकून परता आणि नंतर बटाटे घालून परतावे.
४. मीठ, साखर घालावी आणि परतून झाल्यावर कोथिंबीर- खोबरे घालावे.

No comments:
Post a Comment