Thursday, June 15, 2017

Whole wheat mango muffins

Ingredients:

1 and 3/4 cup whole wheat flour
1 and 1/2 cup mango puree
6 tbsp oil
3/4th cup granulated sugar
1 tsp baking powder
1/2 tsp baking soda
1/4 tsp salt
1 tsp vanilla essence
2 eggs
1 tsp nutmeg powder




Method:

1. Mix whole wheat flour, baking powder, baking soda and salt together, sift and keep aside.
2. Mix oil and sugar together and whisk till light.
3. Add eggs one at a time to the above mix and whisk together well so that the mixture becomes light.
4. Add the mango puree and vanilla essence to this mix and whisk again till well blended.
5. Fold in the flour mixture and nutmeg powder gently till no lumps are formed. Ensure not to over mix. You can also fold in some chopped walnuts/almonds if you like.
6. Pour the mix into a lined/well oiled muffin case up to 2/3rd and bake in a preheated oven at 200 C for 20 minutes or till a skewer comes out clean.



Saturday, June 10, 2017

पालक कोबी वडी

 साहित्य:

१ वाटी बारीक चिरलेला पालक
१ वाटी बारीक चिरलेली कोबी
आलं
धणे -जिरे पूड
लिंबू रस
ओलं खोबरं
बेसन पीठ
तेल

कृती:

१. चिरलेला पालक, चिरलेला कोबी, आलं, धणे-जिरे पूड, लिंबाचा रस, खोबरं एकत्र करून कालवावे.
२. बेसन पिठात गरम तेलाचे मोहन घालून वरील mixture घालून पाणी न घालता कालवावे.
३. तेल लावलेल्या थाळीला हे mixture थापून घ्यावे व उकडावे.

रताळं कचोरी

साहित्य:

रताळं
आरारोट
ओलं खोबरं
खसखस
बेदाणे
काजू
हिरव्या मिरचीचे तुकडे
मीठ, साखर

कृती:

१. खोबरं, खसखस, बेदाणे, काजू, मिरच्या, मीठ, साखर एकत्र करून सारण बनवावे.
२. रताळं उकडून smash करून त्यात आरारोट घालून त्याची वाटी करावी. त्यात वरील सारण भरून तेलात तळावे.



रवा टोस्ट

साहित्य:

१ वाटी रवा
अर्ध वाटी दही
आल्याची पेस्ट
१-२ बारीक चिरलेली हिरवी मिरची
१ बारीक चिरलेला कांदा
१ बारीक चिरलेला टोमॅटो
१-२ गाजराचा किस
कोथिंबीर
मीठ
bread slices

कृती:

१. जरासं फदफदीत दही, रवा, हिरवी मिरची, आलं पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, गाजर किस, मीठ एकत्र करून अर्धा - पाऊण तास भिजू द्या.
२. ब्रेडचे ४ तुकडे करून एकाच बाजूने हे mixture लावा.
३. तव्यावर खाली प्लेन बाजू ठेवून मग उलटून भाजा.


शेव

साहित्य:

१/२(अर्धा) किलो बेसन पीठ
६-७ चमचे ओवा
पाव वाटी तेल (पिठासाठी -२ वाटयांना पाव वाटी तेल)
चवीनुसार मीठ, लाल तिखट, हिंग, पाणी
तळायला तेल

कृती:

१. ओवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा- भरड काढावी.
२. पाण्यात ओवा आणि हिंग घालून चांगले उकळून घ्यावे- ओव्याचा वास पाण्यात आला पाहिजे. पाणी चांगले उकळून घ्यावे आणि गार करावे.
३. बेसनामध्ये मीठ, लाल तिखट, हिंग-ओव्याचे गार पाणी आणि पाव वाटी गरम तेल चमच्याने एकत्र करून घ्यावे. कणिक सैल झाल्यासाखे फटफतीत भिजवायचे.
४. कढईत तेल नीट गरम करून, भरपूर तेलात तळावे.

टिप्स:
१. पिठात हळद अजिबात घालायची नाही.
२. तेल कमी तापवलेले असेल तर फेस येतो.
३. तळलेली शेव tissue paper वर काढावी.
४. पीठाने हात बरबटणारच :)
५. तेल गार झाल्यावर गाळून घ्यावे आणि चकलीला वापरावे.




छोले

साहित्य:

१-२ वाटी छोले
३ लवंग
२ १-इंच दालचिनीचे तुकडे
१ तमालपत्र
५-६ मिरी
१ कांदा
२ टोमॅटो
२ हिरव्या मिरच्या
२ tsp आलं-लसूण paste
धणे-जिरे पावडर
लाल तिखट
कोथिंबीर

कृती:
१. छोले कमीतकमी ५-६ तास पाण्यात भिजवून ठेवावेत. रात्रभर पण चालतात. आधी भरपूर पाणी घालून थोडे मीठ टाकून ५-६ शिट्ट्या करून घ्याव्यात. शिजत नसतील तर चिमूटभर सोडा शिजवताना घालावा.
२. गरम तेलावर आल-लसूण paste, उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि बाकीचा खडा मसाला परतून घ्यावा.
३. कांदा एकदम बारीक चिरून किंवा मिक्सर मध्ये बारीक करून तेलात घालावा.
४. कांदा गुलाबी परतल्यावर मिक्सर मध्ये बारीक केलेला टोमॅटो घालावा आणि चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा.
५. टोमॅटो नीट परतल्यावर त्यात थोडी धणे-जिरे पावडर आणि चवीनुसार लाल तिखट घालावे आणि परतून घ्यावे.
६. मसाल्यामध्ये शिजलेले छोले घालावेत. अर्धे छोले थोडे ठेचून घ्यावेत म्हणजे चांगले एकत्र येतात. १-२ उकळ्या आल्या की गॅस बंद करावा. कोथिंबीर घालून serve करावेत.


Monday, May 15, 2017

शेवयांची खीर

साहित्य:

शेवया
पाणी
१ लिटर दूध(५ कप्स)
साखर
मिल्क मसाला/वेलची पूड
तूप

कृती:

१. पातेले मंद आचेवर गरम करून त्यात तूप घालावे. तूप पातळ झाले कि त्यात शेवया घालून अगदी मंद आचेवर शेवया गुलाबीसर रंग येईस्तोवर भाजाव्यात. गुलाबी रंगावर भाजलेल्या शेवया बाजूला काढून ठेवाव्यात. 
२. थोडे पाणी घेऊन शेवया पातेल्यात शिजवून घ्याव्यात आणि ठेऊन द्याव्यात. वाटल्यास पातेल्यावर झाकण ठेवावे म्हणजे शेवया शिजतील. मधेमधे ढवळावे नाहीतर शेवया करपण्याची शक्यता असते.
३. त्याच पातेल्यात दूध गरम करावे. उकळी आल्यावर त्यात शिजलेल्या शेवया घालाव्यात. चवीनुसार साखर घालावी आणि हवे तेवढे दाट होईपर्यंत उकळावे. नंतर त्यात वेलची पूड/मिल्क मसाला घालावा. गरम किंवा थंड करून वाढावी.

मोदक सारण

साहित्य:

२-२.५ वाट्या ओला नारळ
२ कप गूळ
चहाचा चमचा तांदूळ पीठ
मिल्क मसाला

कृती:

पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि मिल्क मसाला घालावा. ढवळून बाजूला ठेवून द्यावे. शेवटी थोडंसं तांदूळ पीठ घालावे. 

हरभरे चाट

साहित्य:

हरभरे
१ लहान कांदा
१ लहान टोमॅटो
चाट मसाला
लिंबू
तिखट

कृती:

१. हरभरे ८-१० तास पाण्यात टाकायचे. ते मग चाळणीत धुऊन तसेच झाकून १-२ दिवस ठेवायचे म्हणजे त्याला
मोड येतात. किंवा धुतलेले हरभरे एखाद्या रुमालात/फडक्यात खूप तास ठेवले की सुद्धा मोड येतात. (अशीच सर्व कडधान्ये ठेवावी.)
२. मग मीठ व थोडे पाणी घालून ६-७ शिट्ट्या द्याव्यात.
३. नंतर आवडीप्रमाणे चाट मसाला, कांदा, टोमॅटो, लिंबू घालावे. थोडेसे तिखट घालावे.

टीप:
मूग-मटकी-चवळी यांना २-३ शिट्ट्या 

ताकातली भेंडी

कृती:

भेंडी स्वच्छ धुऊन पुसून घ्यायची. नेहमीप्रमाणे तेल/तुपाची फोडणी करणे. त्यात एक-दोन मिरच्या टाकून भेंडी १० मिनिटे परतायची. मग शिजत आली कि मीठ, साखर घालायची. असलं तर दाण्याचं कूट घाल. वाटलं तर थोड्या आंबट ताकात आणखी शिजव. गार झाल्यावर त्यात भरपूर दही घालणे. कोथिंबीर, कांदा optional. 

ताकातला पालक

साहित्य:

जिरे
मोहरी
हिंग
कडीपत्ता
१ जुडी पालक
मूठभर शेंगदाणे
१-२ हिरव्या मिरच्या
२ चमचे डाळीचे पीठ
२ वाट्या आंबट ताक
मीठ/साखर चवीप्रमाणे

कृती:
१. पालक स्वच्छ धुऊन  चिरून घ्यायचा. तो कूकरमध्ये शेंगदाणे, मिरची घालून भाताप्रमाणे (पाणी न घालता) उकडणे.
२. आंबट ताकात तो गार झाल्यावर कुस्करून घालणे. त्यातच २ चमचे डाळीचे पीठ mix करायचे म्हणजे फुटत नाही.
३. पातेल्यात प्रथम तूप/तेलाची फोडणी करा. जिरे/मोहरी/हिंग, कडीपत्ता, थोडी हळद घालून, त्यात पालक घाला. चवीप्रमाणे मीठ, साखर घालून उकळी काढा.


Wednesday, April 5, 2017

भेंडीची रसभाजी

साहित्य:
१/२ किलो भेंडी
२ teaspoon चिंच
तिखट
मीठ
गोड मसाला
गूळ

कृती:

१. फोडणीत भेंडी परतून घ्यायची.
२. साधारण चहाचे २ चमचे चिंचेमध्ये थोडे थोडे पाणी घालून हाताने चोळावी म्हणजे आंबट पाणी निघून येईल ते पाणी भेंडीत घालायचे. नंतर साधारण १ वाटी साधे पाणी त्यात घालणे.
३. मग तिखट, मीठ, गोड मसाला+ गूळ टाकून उकळवून शिजवणे.
४. मध्यम गॅसवर घट्ट झाली तर पुन्हा थोडे पाणी घालून उकळावी. पातळ रस वाटला तर आणखी थोडा वेळ उकळावे म्हणजे दाटसर होते. 

पिठले (कुळीथ/चण्याचे)

साहित्य:

बेसन/कुळीथ पीठ
लसूण
राई
जिरे
हिरवी मिरची
आमसुले
पाणी
कांदा

कृती:

१. प्रथम तेलाच्या फोडणीत (लसूण बारिक चिरून टाकावा - optional) राई, जिरे, हिरवी मिरची बारिक चिरून जमल्यास कांदा टाकून परतावे.
२.  मग साधे गार पाणी घालावे. त्यात २-३ आमसुले टाकावी.
३. चांगले उकळायला लागले की मीठ टाकावे व एका हाताने एकीकडे ढवळत पीठ लावावे.  गुळण्या झाल्या तर हाताने साधे थंड पाणी थोडे थोडे शिंपडावे आणि ढवळावे म्हणजे गुठळ्या मोडतात. बारिक  गॅसवर ५- १० मिनिटे तरी उकळावे. घट्ट वाटले तर १/२(अर्धा) वाटी पाणी घालून २ मिनिटे उकळावे. पातळ CONSISTENCY वाटली तर उकळत असताना परत किंचीत पीठ लावावे.
४. बेसनाचे पिठले (झुणका) दुसऱ्या प्रकारे करायचा असेल तर प्रथम साधारण १/२ (अर्धा)वाटी पीठ + १ वाटी पाणी हाताने चांगले दुसऱ्या भांड्यात mix करून घ्यावे. हे मिश्रण कांदा परतून झाला कि लगेच ओतावे. चमच्याने चांगले ढवळावे. मीठ घालावे आणि १-२ कोकमं टाकावी. झाकण ठेवावे. २ मिनिटांनी झाकण काढून चांगले ढवळावे. परत झाकण ठेवावे. २ मिनिटांनी पुन्हा झाकण काढून चांगले ढवळावे. असे २-३ वेळा करावे( झाकण ठेवणे + ढवळणे) म्हणजे ते चांगले शिजते. 

दडपे पोहे

साहित्य:

पातळ पोहे(४ वाट्या)
ओला नारळ
बारीक चिरलेला कांदा
५-६ चमचे तेल
मीठ
पिठी साखर
हिरवी मिरची
आवडत असेल तर लाल तिखट
कोथिंबीर
आवडत असेल तर टोमॅटो

कृती:

१. पातळ पोहे कढईत थोडा वेळ सुकेच परतून चुरचुरीत करून घ्यावेत. जाड पोहे (२ वाट्या) असतील तर तसेच घ्यावेत.
२. त्यात ओला नारळ (भरपूर), कच्चेच म्हणजे न तापवलेले तेल ५-६ चमचे घालावे.
३. मीठ, साखर, कांदा , ओली मिरची अगदी बारिक चिरून घालावी.
४. लाल तिखट आणि कोथींबीर घालून हातानेच mix करावे.
५. आवडत असल्यास tomato बारीक चिरून घालावा.

Monday, February 20, 2017

साबुदाणा खिचड़ी

साहित्य:

२ वाटी साबुदाणा (१ माणसाला १ वाटी)
१/२(अर्धी) वाटी दाण्याचे कूट (अंदाजे १ वाटी साबुदाण्याला १/४th वाटी)
चवीनुसार साखर
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा जिरे
२-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
२-३ चमचे तेल/तूप

कृती:

१. साबुदाणा कमीतकमी ३-४ तास आधी पाण्यात भिजवावा. आधी स्वच्छ धुवून घ्यावा. अगदी किंचित जास्त पाणी ठेवावे.
२. फोडणीमध्ये तेल/तूप गरम झाल्यावर जिरे घालावे. जिरे तडतडल्यावर मिरच्या घालून मग त्यावर साबुदाणा घालावा.
३. त्यात मीठ, साखर, कूट घालून नीट एकत्र करावे आणि वाफ काढावी. साबुदाणा चिकट झाला असेल तर झाकण ठेऊ नये. आवडत असेल तर लिंबू, खोबरे, कोथिंबीर घालावी.

टीप:

१. जर बटाटा  घालायचा असेल तर कच्चा बटाटा फोडणी मध्ये परतून घ्यावा आणि नीट शिजल्यावर साबुदाणा घालावा. उकडलेला बटाटा देखील घालू शकतो.
२. आवडत असेल तर लाल तिखट किंवा लाल मिरची देखील फोडणीत घालू शकतो.






Monday, February 13, 2017

उपमा

साहित्य:
२ वाटी रवा
पाव वाटी तेल
१/२ tsp मोहरी
१/२ tsp जिरे
१/२ tsp किसलेलं आलं
चिमूटभर हिंग
१-२ हिरवी मिरची
१ tsp उडीद डाळ (optional)
४ वाट्या पाणी
१ कांदा
१ टोमॅटो (optional)
चवीनुसार साखर + मीठ

कृती:

१. रवा आधी सुकाच चांगला भाजून घ्यावा.
२. तेलाची राई (मोहरी) + जिरे + +हिंग+ मिरची +उडीद डाळ  + आलं + बारीक चिरलेला कांदा घालून फोडणी करावी.
३. फोडणीमध्ये आधी तापवलेला रवा घालावा आणि ३-४ मिनिटे चांगला गरम होऊ द्यावा. साखर ,मीठ घालावे. गॅस बारिकच राहू द्यावा.
४. मग आधण (गरम) साधारण दुप्पट पाणी हळूहळू घालावे. ५-१० मिनिटे बारीक गॅसवर वाफ येऊ द्यावी. असेल तर कोथिंबीर टाकावी. टोमॅटो टाकायचा असेल तर फोडणीनंतर कांडा परतावा. मग सुकाच भाजलेला रवा घालावा. मग अगदी बारीक चिरलेला tomato घालावा. ५ मिनिटे तरी चांगले परतावे. मग नंतर गरम पाणी घालावे.

गोड़ शिरा

साहित्य:

२ वाटी रवा
१ वाटी तूप
४-४.५ वाट्या पाणी किंवा दूध+पाणी
३.५ ते ४ वाट्या साखर
वेलची पूड/EVEREST  दूध मसाला
काजू/बदाम/बेदाणे (optional)
केळं (optional)

कृती:

१. प्रथम रवा सुकाच चांगला तांबूस भाजून घ्यावा. भाजताना खूप मोठा गॅस ठेवायचा नाही, रवा लगेच करपतो.
२. तूप कढईत तापवायचे, त्यात भाजलेला रवा घालायचा. एकीकडे पाणी/दूध+पाणी खूप गरम करावे.
३. रवा तुपात टाकला कि गॅस बारीक करावा. मग किंचित मीठ टाकावे. त्यात लगेचच(कारण रवा भाजलेला असतो) वरील liquid हळूहळू घालावे. २ मिनिटे झाकण ठेवावे.
४. २ मिनिटांनी झाकण काढावे आणि त्यात साधारण रव्याच्या १.५ ते २ पट साखर घालावी. आधी जास्त घालू नये. चवीप्रमाणे वाढवता येते. थोडा वेळ पुन्हा वाफ आणावी.
५. केळं घालायचं असल्यास कुस्करून घालावे. असल्यास वेलची पावडर/एवरेस्ट मसाला घालावा. पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवून परतावे.
६. पाणी/दूध adjust करावे. खूप घट्ट वाटत असेल तर गार liquid चालते.

टीप:

१. गोड़ शिरा तुपातच करायचा, तेलात नाही.
२. काजू/बदाम घालायचे असतील तर प्रथम गरम तुपात किंचित परतून लगेचच रवा घालावा.
३. बेदाणे साखरेबरोबरच घालावे.

साबुदाणा वडा

साहित्य:

२ वाट्या साबुदाणा
२-३ बटाटे
१-२ चमचे लाल तिखट
१-२ चमचे जिरे
१/२ वाटी दाण्याचे कूट
कोथिंबीर 
मीठ चवीनुसार

कृती:

१. साबुदाणा ५-६ तास पाण्यात भिजत घालावा. पाणी ठेवू नये.
२. बटाटे उकडून खूप कुस्करावे/किसावे.
३. त्यात लाल तिखट, जिरे, मीठ, कोथिंबीर आणि दाण्याचे कूट घालावे. सर्व खूप छान भरपूर वेळ मिक्स करावे. हातावरच चपटे गोळे करून तळावे.

मूग डाळ खिचड़ी

साहित्य:

२ वाट्या तांदूळ
१/२ वाटी मूग डाळ
१/४TH टीस्पून मोहरी
१/४TH टीस्पून जिरे
१ चिमूट हिंग
१-२ काड्या (१०-१२ पाने) कडीपत्ता
१/४TH  टीस्पून हळद
१ टीस्पून तिखट
१ टीस्पून गोड मसाला
१ टीस्पून धणे-जिरे मसाला
चवीनुसार मीठ

कृती:

१. तांदूळ आणि डाळ धुऊन चाळणीत टाकावे किंवा पाणी पूर्णपणे काढून ठेवावे.
२. फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता घालावा.
३. हळद घालून धुतलेले तांदूळ आणि डाळ टाकावे आणि ५-१० मिनिटे परतावे.
४. मीठ, तिखट, गोड मसाला/धने जिरे मसाला घालून कूकरच्या डब्यात साहित्य घालावे. साधारणपणे १.५(दीड) पट पाणी घालून २-३ शिट्ट्या द्याव्यात. Pressure pan मध्ये घातले तरी २-३ शिट्ट्याच कराव्यात.
५. कोथिंबीर आणि खोबरे घालून serve करावे. वरून तूप घालावे.